मुंबईत ‘ट्रम्प टॉवर’ बांधताना

This was published as the cover story in the fortnightly Parivartanacha Watsaru (16-31 August 2016). This is a translation from English to Marathi by Avadhoot of “When Donald Trump Came to Mumbai” from the Economic & Political Weekly (EPW), Vol.51, Issue No. 23, 4 June 2016. You can download the PDF of the English article here or download the PDF of the Marathi article here (from Parivartanacha Watsaru, 16-31 August 2016).

Parivaratanacha Vaatsru (Marathi), 16-19 August 2016
Parivartanacha Watsaru (Marathi), 16-19 August 2016

फोर्ब्स इंडिया’ या मासिकाच्या सप्टेंबर २०१४च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी खास त्यांनाच साजेल असं असभ्य विधान केलं होतं: “तुमच्याकडचं स्थावर मालमत्तेचं क्षेत्र अविश्वसनीयरित्या स्वस्त आहेमुंबई हे महान शहर आहे आणि तरीही तिच्या तुलनेतील इतर शहरांसारखी या शहराची किंमत लावलेली दिसत नाही. उलट दुय्यम महत्त्वाच्या शहरांपेक्षाही मुंबईची किंमत कमी ठेवलेली आहे. याचा अर्थ, गुंतवणूकदारांना इथं प्रगतीसाठी प्रचंड वाव आहे.” (श्रीवास्तव २०१४). अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या मोहिमेमध्ये त्यांनी ज्या थरावरून शेरेबाजी केली तेवढा मुंबईविषयीचा त्यांचा शेरा वादग्रस्त नव्हता, पण ट्रम्प यांची ही अतिशयोक्ती भारतात मोठी बातमी बनली. वास्तविक भारतामध्ये मुंबईतील घरबांधणी बाजारपेठ देशात सर्वांत महागडं आहे. भारताच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचं उदारीकरण १९९०च्या दशकामध्ये झालं, तेव्हा मुंबईतील महागड्या स्थावर मालमत्ता क्षेत्राविषयीच्या बातम्या नियमितपणे वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर प्रसिद्ध होत असत. अनेकदा मुंबईची तुलना भारतातातील दिल्ली, चेन्नई किंवा बंगलोर अशा समकक्ष शहरांऐवजी अधिक संपन्न लंडन किंवा न्यूयॉर्क अशा जागतिक शहरांशी होते.

अमेरिकी डॉलर व भारतीय रुपया यांच्यातील विनिमय दर (एक अमेरिकी डॉलर= ६०६२ रुपये) पाहिला, तर परकीय गुंतवणूकदाराच्या दृष्टीनं ट्रम्प यांनी केलेल्या मूल्यांकनासंबंधीच्या विधानांमध्ये काही अर्थ सापडू शकतो. २०१४ साली मॅनहॅटनमध्ये स्थावर मालमत्तेचा दर प्रति चौरस फूट १,२५०,५०० डॉलरच्या दरम्यान होता, आणि मुंबईत त्याच काळात मुख्य ठिकाणांच्या इथला दर रु. ४०,०००५०,००० (किंवा ६५०८०० डॉलर) इतका होता. या थेट तुलनेमध्ये अर्थातच पायाभूत सुविधांमधील मोजता न येणारे भेद किंवा दोन्ही शहरांसंबंधीचे इतर मुद्दे लक्षात घेतलेले नाहीत. शिवाय तुलनात्मक शहरी उत्पन्न पातळी व अमेरिका आणि भारत यांच्यातील चलनाच्या संदर्भात प्रति एकक क्रयशक्ती समानता (परचेजिंग पावर पॅरिटीपीपीपी) किती आहे, हेही या तुलनेत विचारात घेतलेलं नाही. क्रयशक्ती समानतेचे समीकरण जुळवून त्यानुसार गणित केल्यास मुंबईतील प्रति चौरस फुटाचा दर १,८००,५०० अमेरिकी डॉलरच्या घरात जातो, म्हणजे सर्वसाधारण नागरिकासाठी न्यूयॉर्कच्या तुलनेत मुंबई हे शहर ५० टक्के अधिक महागडं ठरतं, असा अंदाज मध्यंतरी एका पत्रकारानं वर्तवला होता (कौल २०१४).

Continue reading मुंबईत ‘ट्रम्प टॉवर’ बांधताना