Tag Archives: temples

आलेखन व आखणी : वासाहतिक बॉम्बेमध्ये झालेलं सँडहर्स्ट रस्त्याचं बांधकाम, १८९८-१९२५

This is a Marathi translation by Avadhoot of “Plotting & Scheming: Constructing Sandhurst Road in Colonial Bombay, 1898-1925”.

सेंटर फॉर स्टडीज् इन सोशल सायन्सेन (सीएसएसएस), कोलकाता’ इथं ३ मार्च २०१७ रोजी मी दिलेल्या व्याख्यानाचा हा गोषवारा आहे. प्राध्यापक लक्ष्मी सुब्रमण्यमडॉ. प्राची देशपांडे हे इतिहासकार या कार्यक्रमाचे यजमान व अध्यक्ष होते. ‘एम्पायर’स् मेट्रॉपलिस: मनी, टाइम अँड स्पेस इन कलोनिअल बॉम्बे, १८६०१९२०’ या माझ्या आगामी पुस्तकातील दोन प्रकरणांवर हे व्याख्यान आधारलेलं होतं.

आशियातील ब्रिटिश साम्राज्याच्या बंदरांवर १८९०च्या दशकाच्या अखेरीला गाठीच्या प्लेगाची साथ पसरली. यामुळं साम्राज्यवादी सत्तेचं प्रभुत्व व नियंत्रण असलेल्या नागरी केंद्रांमधील असुरक्षिततेला नाट्यमय वळण मिळालं. कलकत्ता व मुंबई यांसारखी वासाहतिक शहरं प्रादेशिक व जागतिक पातळीवर लोक, पैसा व यंत्रं यांच्या दळणवळणाची प्रवेशद्वारं होती. वाफेची इंजिनं, रेल्वे आणि वीज यांच्या जाळ्यातून या शहरांचं केंद्रीकरण झालं होतं व त्यांना चालनाही मिळत होती. व्यवसाय आणि राजकारण या दोन्हींचा अंतःप्रवाह व्यापाराचं स्वातंत्र्य व कायद्याचं राज्य असा होता. या शहरांमध्ये वासाहतिक सत्ताधारी, भारतीय उच्चभ्रू आणि नागरी जनता यांच्यात सत्तेचं वाटप झालेलं होतं आणि सत्तासंघर्षही त्यांच्यातच होत असे.

प्लेगच्या साथीमुळं विसाव्या शतकातील मुंबईमध्ये सामाजिकदृष्ट्या व स्थलावकाशदृष्ट्या कोणते बदल झाले याचा शोध घेण्याचा प्रयत्न माझ्या सादरीकरणात केलेला आहे. पूर्व व पश्चिम भागांना जोडणाऱ्या सँडहर्स्ट रस्त्याच्या बांधणीसंदर्भात हा अभ्यास केलेला आहे. १९५५ सालापासून ‘सरदार वल्लभभाई पटेल (एसव्हीपी) मार्ग’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या रस्त्याचं आधीचं नाव मुंबई प्रांताचा ब्रिटिश गव्हर्नर सँडहर्स्ट याच्यावरून ठेवलेलं होतं. १८९६ साली पश्चिम भारतातील गाठीच्या प्लेगची साथ निवारण्यासाठी ‘बॉम्बे इम्प्रूव्हमेन्ट ट्रस्ट’ (बीआयटी) या संस्थेची स्थापना याच सँडहर्स्ट यांनी केली.

Continue reading आलेखन व आखणी : वासाहतिक बॉम्बेमध्ये झालेलं सँडहर्स्ट रस्त्याचं बांधकाम, १८९८-१९२५